ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

अध्यक्षपदी द्रोणाचार्य कोळी

निलंगा तालुका प्रतिनिधी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रप्रतिनिधी राज्य, निलंगा तालुका अध्यक्षपदी द्रोणाचार्य मारुती कोळी यांची निवड करण्यात आली आहे. द्रोणाचार्य कोळी हे अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ग्रामीण वार्ता या वृत्तपत्राचे संपादक आहेत.

त्यांनी पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटवला असून ते सामान्य व तळागाळातील लोकांना व सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम नेटाने करीत आहेत. म्हणून त्यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य निलंगा तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हाध्यक्ष मा. लहूकुमार शिंदे यांनी ही घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून द्रोणाचार्य कोळी यांनी आपल्या धारदार लेखणीने तळागाळातील प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे, त्यांच्या याच कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान निलंगा तालुका कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. निलंगा तालुका अध्यक्ष द्रोणाचार्य मारुती कोळी, उपाध्यक्ष अप्पासाहेब मुळजे, सचिव श्याम मुळजकर, सह सचिव महेश गरांडे, कोषाध्यक गुरुनाथ मोहळकर, महिला अध्यक्ष सौ. आशा आयतनबोने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, संघटक बापू गायकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली पाटील, संघटक संजय राजुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड.परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ.वसंत बिरादार, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *