ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या फेब्रु./मार्च – 2026 एस.एस.सी.परीक्षेचा निकाल दि.08/05/2026 रोजी घोषित करण्यात आला. या परीक्षेत भालगाव येथील भालेश्वर हायस्कूल भालगावचे एकूण 64 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत विद्यालयामध्ये दि.9/5 /2026, वार- शनिवार रोजी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्या. श्री हनुमान गोर्डे,ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब खेडकर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री भरत कासुळे यांचा देखील पोलीस सब इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावी एस.एस.सी बोर्ड परीक्षेत प्रथम तीन विदयार्थी खालील प्रमाणे आहेत :1) कु. कासुळे कांचन गोविंद -90.20 %2) चि. वनारसे समर्थ सुनील -89.20 %2) चि. खेडकर ओंकार आजीनाथ – 89.20%3) कु. सोनवणे प्रिया भागवत-88.80%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या सर्व शिक्षकांचे कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.डॉ.श्री विद्याधर काकडे, जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, विश्वस्त श्री.पृथ्वीसिंग भैय्यासाहेब काकडे,कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.डॉ.श्री लक्ष्मणराव बिटाळ, शैक्षणिक विभाग प्रमुख श्रीम. वंदना पुजारी, शैक्षणिक विभाग सहप्रमुख श्री अशोक आहेर,भालेश्वर हायस्कूल भालगावचे मुख्या. श्री हनुमान गोर्डे ,समन्वयक श्री दिगंबर नजन, वर्गशिक्षक श्री भाऊसाहेब शिंदे,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *