-
पंचवीस वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव
-
विठ्ठल नगर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा.
- पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण
शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या आयडॉल शिक्षक निवड उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठल नगर शाळेचे उपशिक्षक श्री सुनील निवृत्ती खेडकर यांची आयडॉल टीचर सन 2026/2027 या वर्षासाठी निवड झाली.
पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठल नगर या शाळेचे उपक्रमशील, तंत्र स्नेही शिक्षक यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी श्री खेडकर सुनील यांना आयडॉलशिक्षक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. श्री सुनील खेडकर यांनी यापूर्वी देखील जिल्हा, राज्य ,तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून विविध प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. लोकसभागातून शाळेसाठी विविध साहित्य ,वस्तू प्राप्त केलेले आहेत.सदर शिक्षकाची आयडॉल टीचर म्हणून निवड करण्यात आली. या निवडी बद्दल गटशिक्षणाधिकारी सचिन राख , शालेय पोषण आहार अध्यक्ष रामनाथ कराड , केंद्रप्रमुख बंडू नागरगोजे , पिंपळगावचे सरपंच राजेंद्र शिरसाट ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश शिरसाट, तीनखडी गावचे सरपंच उद्योजक भगवानराव दराडे पाटील, अनिल खेडकर, संभाजी खेडकर, उमेश खेडकर, कानिफ आंधळे, नामदेव खेडकर, सुरेश खेडकर व सर्व सामाजिक शैक्षणिक स्तरातून श्री सुनील खेडकर यांचे कौतुक करून अभिनंदन केले.शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सुनील खेडकर विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण विविध उपक्रम राबवत आहेत. या पुरस्कार बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.