
डोंबिवली प्रतिनिधी
सामाजिक कार्याची आवड, होतकरू महिलांना बरोबर घेऊन काम करण्याची इच्छा, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे समाजसेवक कैलास सणस यांच्या संकल्पनेतून नारीउन्नती सोशल फाउंडेशन आणि आम्ही आहोत ना! या सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त कार्यालयाचे उद्घाटन नुकताच कुंभारखाण पाडा, डोंबिवली पश्चिम येथे जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले
.या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून दोन्ही संस्थांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी कल्याण-डोबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा’ह’प्रभाग क्षेत्र सभापती डॉ.सौ.रविना राहुल म्हात्रे, समाजसेविका ट्विंकल योगेंद्र भोईर, जेष्ठ श्रेष्ठ एकनाथ म्हात्रे, यशवंत भोईर,फेस्काम कोकण प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष विलास काळे, समाजसेवक राहुल श्रीधर म्हात्रे,prathyush उद्योग समूहाच्या शितल राऊत व इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते.नारीउन्नती सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.ज्योती सचिन उबाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.तसेच पदाधिकारी तृप्ती चौहान, मयुरी गायकर, नूतन पाटील, मंगल पांचाळ,मृणाली सणस यांनी कार्यक्रमात सहकार्य केले.तसेच आम्ही आहोत ना!सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास सणस यांनी सुत्रसंचलनाची जबाबदारी सांभाळत उपस्थितांचे स्वागत केले.तसेच पदाधिकारी विठ्ठल नाईक, सचिन उबाळे, प्रविण साळवी, विजय भोईर, संदेश कदम,राजीव जाधव, युवराज शेलार,राजेश पाटील,करण चौहाण, दत्तात्रय भिसे यांनी कार्यक्रम आयोजनात सहकार्य केले.दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे, प्रल्हाद परशुराम म्हात्रे, संदेश हरिश्चंद्र पाटील तसेच नगरसेविका सौ.कविता म्हात्रे,डाॅ.सौ.रसिका संदेश पाटील यांनी कार्यालयाला आवर्जून भेट देऊन शुभेच्छा दिल्या.तसेस ॲड.प्रदीप बावस्कर,सतीश मोरे (गोवर्धन स्कूल) प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, नितीन पवार, सचिन धुरी, प्रशांत देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून दोन्ही सामाजिक संस्थांना सामाजिक कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास महिला बचत गटातील महिला तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती, गरजू व्यक्तींना मदत आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या कार्यलयाच्या माध्यमातून समाजसेवेचे नवे पर्व सुरु होत आहे.सर्व मान्यवर, पदाधिकारी, महिला भगिनी, मित्र परिवार आणि उपस्थित नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उद्घाटन सोहळा उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.