आ. सतीशभाऊ चव्हाण यांच्या प्रचाराला पैठण तालुक्यात वेग.
शाळा-महाविद्यालयांना शासकीय आफीस ला भेटी देत पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन
पैठण तालुका प्रतिनिधी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. सतीशभाऊ चव्हाण यांच्या विजयासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या प्रचारार्थ पैठण शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत असून, शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन पदवीधर मतदारांनी सतीशभाऊ चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या प्रचार मोहिमेंतर्गत पैठण शहरातील विविध महाविद्यालयांसह आडूळ, बाळानगर, बिडकीन, धोरकीन, पिंपळवाडी पिराची, लोहगाव, ढाकेफळ, कचनेर, विहामांडवा, नवगाव, आपेगाव, जायकवाडी, कावसान, घारी, दादेगाव, पाटेगाव, चनकवाडी आणि वडवाळी आदी गावांतील शाळा व महाविद्यालयांना भेटी देण्यात आल्या. यावेळी पदवीधर मतदारांशी संपर्क साधून महायुतीचे उमेदवार आ. सतीशभाऊ चव्हाण यांना विजयी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
पैठण तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या या प्रचार मोहिमेतून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. गावोगावी संपर्क वाढवून पदवीधर मतदारांपर्यंत उमेदवाराची भूमिका पोहोचविण्यावर भर दिला जात आहे. महायुतीच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रचार मोहिमेत तालुकाध्यक्ष विलास भैय्या शेळके, विधानसभा कार्याध्यक्ष विनोद भाऊ तांबे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, माजी प्राध्यापक पी. आर. थोटे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक जितू परदेशी, युवक जिल्हाध्यक्ष किशोर तावरे, योगेश बप्पा जोशी, भाजपा समन्वयक योगेश चाटुफळे, सुरेश गायकवाड, विलास लिपाने, बद्री पाटील गोरडे, कृष्णा लांडे सर आणि नितीन पोकळे सर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
