ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

 – जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान बुध्द यांच्या बुद्ध पौर्णिमा महाराष्ट्र राज्यात प्रथमच सोलापूर शहरात जय भारत माता सेवा समिती,नवी दिल्लीच्या वतीने भव्यदिव्य मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.


रॅलीत तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला बुद्धं शरणम् गच्छामी्, धम्मं शरणम् गच्छामी्, संघं शरणम् गच्छामी्, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच तथागत भगवान गौतम बुद्धांची  जयंती करण्यात आली.
जय भारत माता सेवा समितीच्या वतीने सोलापूर येथे बुध्द जयंती निमित्त पार्क चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांनी पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणूकीस सुरुवात झाली.
शहरातील महापुरुषांना अभिवादन करुन पुतळा चौकातील अहिल्यादेवी होळकर आणि देशाच्या स्वांतत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या  शहीदांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बोधीसत्व महामानव डॉ शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले, राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांचे कट्टर अनुयायी आणि देशाचे माजी गृहमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पार्क चौक,डफरीन चौक मार्गे कामत हाॅटेल चौक,व्हि.आय.पी.रोड,सात रस्ता चौक येथून मार्गक्रमण करत तब्बल दहा किलोमीटर अंतर पार करून मिरवणूक हेरिटेज लाॅन येथे पोहचली, विविध राज्यांतून आलेल्या सर्व धर्मीय देशवासीयांनी स्वादिष्ट अन्नदानाचा आस्वाद घेतला.
     संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दिपप्रज्वलन आणि भगवान बुध्द, महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.राष्ट्रीय सदस्य सिद्धार्थ तलवारे यांनी पंचशील त्रिशरण घेतले त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले,दासराव हंबर्डे यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले.१मे रोजीच कामगार दिनानिमित्त हेरिटेज लाॅन येथील सर्व कामगार आणि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कामगारांचा हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज ढगे विरार,संयम शहा सोलापूर, विष्णू मदने लातूर,डॉ.मृत्यंजय निलंगे सोलापूर, पप्पु पाटील खानापूरकर, मल्लिकार्जुन सारवाड गुलबर्गा आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवराज बिराजदार कॅशियर,शक्ती निलंगे, संजय शिंदे, गिरीश तंबाके, बसवराज बिरादार पत्रकार, अरूण बडदाळकर,विराज पाटील, अप्पासाहेब बिरादार, महेश रगडे, एंटामणी, हनमंत कावळे, उमेश, संतोष,गुंडप्पा,साखरे, अजय शिंदे आदींनी अहोरात्र मेहनत घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दार्थ तलवारे यांनी केले तर संचलन बिदर येथील टि.व्ही.स्टार नवलिंग पाटील यांनी केले, सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील आणि विविध जाती धर्माचे लोक या रॅलीत सहभागी झाले होते.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *