हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड,!

पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने घाडगे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय त्रिमूर्ती नगर, नेवासा या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी युवराज पंडित सातकर याने 67 किलो वजन गट कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
त्याची या स्पर्धेतून हरियाणा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल युवराज सातकर याचे पाथर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. बबन चौरे, पर्यवेक्षक सलीम शेख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.