ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण

तालुक्यातील भालगाव येथील आधुनिक शेती करणारे शेतकरी गोवर्धन प्रल्हाद खेडकर यांना महाराष्ट्र शासनाचा मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी येथे कृषी दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला.
गोवर्धन खेडकर हे प्रगतशील शेतकरी आहेत. गेल्या दहा वर्षापासून ते शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. यामध्ये त्यांनी बटाट्याचे एकरी १४ टन उत्पन्न काढले. तुर व मुगाचे एकरी २१ क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन काढले होते. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने कृषी सन २०२३-२४ सन्मान व पुरस्कार वितरण समारंभ २०२६ चे आयोजन केले होते. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांच्या सन्मान सोहळ्यात शेतकरी गोवर्धन खेडकर यांना शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल खेडकर यांना भालगाव येथील पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेतील मैत्री शेतकरी गट व झुंजार महिला शेतकरी गट तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पाथर्डी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *