
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना काँग्रेस चे निवेदन.
मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी किरण धायले.
सरकारने जाहीर केलेली दुष्काळ निधी पाच हजार रुपये दिवाळीच्या आत सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे होता, परंतु ठराविक शेतकऱ्यांनाच हा निधी मिळाला व बरेच शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले, त्यांची दिवाळी अंधारात गेली.
————————————————————————-
शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये एक लाख सानुग्रह अनुदान त्वरित त्यांचे खात्यात नोव्हेंबर अखेर जमा करा.
————————————————————————-
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, जमिनी खरडून वाहून गेल्या, नुकसान झाले, पंचनामे केले गेले, सरकारला लोकप्रतिनिधी , मुक्ताईनगर मतदार संघाचे आ. चंद्रकांत भाऊ पाटील यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांना व्हिडिओ कॉल द्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेले नुकसान दाखवले, सरकार दरबारी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत व्यथा मांडल्या , टीव्हीच्या माध्यमातून, महसूल विभागामार्फत, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली व पंचनामे केली पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचनामे केले परंतु शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत दमडी ही देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. शेतकरी आधीच कर्जबाजारी झालेला आहे सरकारने दिलेली आश्वासने त्वरित विनाशर्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम त्वरित जमा करावी
तसेच अजूनही केळी पीक विम्याची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांचे खात्यात जमा झालेले नाही. वास्तविक सप्टेंबर अखेर पिक विमा शेतकऱ्यांच्या खातात जमा होणे आवश्यक होते. शेतकऱ्यांना हमीचा पिक विमा रक्कम त्वरित देण्यास पिक विमा कंपनीस निर्देश देऊन रक्कम जमा करण्यात यावी असे आदेश सरकारच्या माध्यमातून करावे.
त्याचप्रमाणे दुष्काळग्रस्तांना दिली जात असलेली अग्रीम रक्कम बँकांनी कर्ज खात्यात वळती करू नये तसेच कर्जमुक्ती योजनेचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना नव्या कर्जासाठी नकार देऊ नये.निवेदन देतांना मुक्ताईनगर काँग्रेस च्या महिला तालुका अध्यक्षा सौ. ज्योती संजय धामोडे,अनिल वाडीले महाराष्ट्र प्रदेश सचिव विमुक्त जाती, भटक्या जमाती (VJNT ) विभाग काँग्रेस कमिटी, शे. भैय्या शे. करीम अध्यक्ष अंतुर्ली काँग्रेस कमिटी,सुभाष समाधान कोळी, प्रकाश कोळी व कार्यकर्ते उपस्थित होते.