कार्यशाळेत ५४५ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण
विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता व कल्पकता तसेच विविध कौशल्य वाढविण्यासाठी पाथर्डी येथील पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर पाथर्डी या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली आकाश कंदील बनवून प्रदूषणमुक्त दिवाळीचा नारा दिला.

विद्यार्थ्यांनी प्लास्टिकला फाटा देऊन केवळ रंगीबेरंगी कागद, कार्डशिट कागद, टिंटेड पेपर,कापडी लेस, डिंक, दोरा, गोंद तसेच पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून आकर्षक आकाश कंदील व पणती निर्मिती तयार केली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्वनिर्मितीचा आनंद दिसत होता.
श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर मध्ये “इको फ्रेंडली आकाश कंदील बनवा व पणती निर्मिती” कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. या कार्यशाळेत शाळेतील ५४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद मेढे,समन्वयक ज्ञानेश्वर गायके, पर्यवेक्षक संपत घारे, कलाशिक्षक दीपक राठोड यांनी दिवाळीनिमित्त पर्यावरण पूरक वस्तूंचा उपयोग करून प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक शरद मेढे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
कार्यशाळेत तयार केलेले आकाश कंदील व पणती दिवाळीनिमित्त घरावर लावून बाजारातील प्लास्टिकचे आकाश कंदील वापरणार नाहीत असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमाचे पालक वर्गातून आनंद व समाधान व्यक्त केले.
विद्यालयातील कलाशिक्षक दीपक राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कलाशिक्षक दीपक राठोड, रत्नमाला सांगळे, सुवर्णा ढाकणे, गार्गी तरवडे, अर्चना धायतडक, शितल आंधळे, अनिता केदार, दादासाहेब उदमले,शशांक महाजन, रेखा गणगे, माधुरी रणदिवे, जयश्री खोरदे यांनी परिश्रम घेतले.