ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

पैठण  तालुका प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील रामनगर येथील अनिता नितीन पाटील वानखडे यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कामगार मोर्चाचे ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश शेळके यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.
या निवडीमुळे रामनगर परिसरासह पैठण तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या तसेच कामगारांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.
या संघटनात्मक जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर अनिता वानखडे यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या कामगार मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अनिता वानखडे यांच्या निवडीबद्दल पैठण तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नव्या जबाबदारीच्या माध्यमातून कामगार मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि कामगारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी त्या पुढाकार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *