ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

छत्रपती संभाजीनगर, ५ मार्च:
रस्ते अपघाताच्या वेळी जखमींना तातडीने मदत करून रुग्णालयात दाखल करणाऱ्या सेवाभावी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘राह-वीर’ योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात २०९ अपघातप्रवण स्थळे

सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या २०२३-२४ च्या सर्वेक्षणानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०९ अपघातप्रवण स्थळे आहेत. या ठिकाणी अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

मोबाईलवर मिळणार आगाऊ सूचना

अपघातप्रवण स्थळांचे भौगोलिक अंकन करण्यात आले असून ही माहिती भौगोलिक स्थान सेवा देणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोबाईलवर पुढील अपघातप्रवण स्थळाबाबत आगाऊ सूचना मिळू शकणार आहे.

‘गोल्डन अवर’मध्ये मदत महत्त्वाची

रस्ते अपघातानंतर जखमींना तातडीने उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’ कमी करण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

‘राह-वीर’ योजनेअंतर्गत २५ हजारांचे पारितोषिक

अपघाताच्या वेळी मदत करणाऱ्या नागरिकांना चौकशीची भीती वाटू नये म्हणून केंद्र सरकारने ‘राह-वीर’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *