ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

पुसद शहरातील काकडदाती येथे मन सुन्न करणारी एक घटना उघडकीस आलेली आहे. चाळीस वर्ष इसमाला नग्न करून, त्याचे हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. आणि उपचार दरम्यान या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आलेली आहे.

दरम्यानज्यावेळी या चाळीस वर्ष इसमाचे हातपाय बांधून रस्त्यावर टाकण्यात आले होते, त्यावेळी उपस्थित लोकांमार्फत मात्र मोबाईल मध्ये फक्त व्हिडिओ घेण्यात आले. या घटने अन्वये पुसद शहर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. शिवानंद शंकर हुलकाने यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये असे नमूद आहे की, दिनांक एक एप्रिल 2026 रोजी फिर्यादी गावात हजर असताना, अंदाजे साडेदहा वाजता च्या सुमारास काकडदाती येथील एका व्यक्तीचा त्यांना फोन आला व सांगितले की, कृष्ण मंदिराला लागून विठ्ठल भाकरे यांचे घरासमोर तुझा चुलत भाऊ सखाराम हूलकाने यास, विठ्ठल नागोराव भाकरे, रोहन विठ्ठल भाकरे, प्रशांत कुमार उर्फ पवन विठ्ठल भाकरे, व योगेश उत्तम भाकरे, हे मारहाण करीत आहे. सखाराम यांच्या अंगावर कपडे सुद्धा नाहीत. त्यांचे कपडे घेऊन ये… अशी माहिती मिळताच फिर्यादी यांनी तात्काळ, सखाराम यांचे घरून कपडे घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठले. विठ्ठल भाकरे यांचे घरासमोरील रोडवर, सखाराम हुलकाने, हातपाय बांधून, नग्न अवस्थेत खाली पडून होते. यावेळी वरील चारही मारहाण करणारे व्यक्ती त्या ठिकाणी उभे होते. व त्यापैकी विठ्ठल भाकरे हे सखाराम यांना पाईपने, चापट, लाथा, बुक्क्यांनी मारहाण करीत होते. फिर्यादी यांनी या मारहाणीचे कारण विचारले असता, “ तू याला इथून घेऊन जा ” असे सांगण्यात आले. यावेळी फिर्यादी यांनी सखाराम यांना श्रीरामपूर येथील त्यांचे घरी आणले. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सखाराम यांना मेडिकेअर हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे रेफर करण्यात आले. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी च्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गंभीर जखमी असलेल्या सखाराम यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारची फिर्याद पुसद शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली आहे. या फिर्यादी अन्वये, विठ्ठल नागोराव भाकरे वय 52 वर्ष, रोहन विठ्ठल भाकरे वय 20 वर्ष, प्रशांतकुमार उर्फ पवन विठ्ठल भाकरे वय 23 वर्ष, तिघेही राहणार काकडदाती…. योगेश उत्तम भाकरे वय 34 वर्ष राहणार बोरी खुर्द… यांचे विरुद्ध भारतीय न्यायसंहितेची कलम… 103…1…3…5… अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे… व वरील चारही आरोपींना पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती मिळालेली आहे. सखाराम हूलकाने यांना हात-पाय बांधून अमानुष मारहाण का करण्यात आली ? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही….घटनेचा पुढील तपास पुसद शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे…

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *