
पैठण तालुका प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील आखातवाडा येथे प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय विशेष कॅम्पमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून विविध मान्यवरांसह ग्राम पंचायत सदस्य कल्याण पोकळे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभून या कॅम्पचा निरोप समारोप समारंभ अत्यंत आनंदी वातावरणात संपन्न झाला.
अखतवाडा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉ. उमाकांत राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना रासेयो ही का अमलात आली तसेच महात्मा गांधी,गाडगेबाबा यांचे कार्याबाबत माहिती देवून आजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करणे गरजेचे आहे असे सांगितले.तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शिवानंद सोनकांबळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सहभागी झालेल्या सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह विद्यार्थी व गावकऱ्यांचे आभार मानत सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष राठोड यांनी विशेष कॅम्पच्या सात दिवसाचा अहवाल सादर केला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत व्यसनमुक्तीपर उत्कृष्ट नाटिका सादर केली.सदर कार्यक्रमात बेस्ट व्हॅलेंटर साक्षी ससाने व विशाल बारे यांना देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. विजयकुमार वैराटे यांनी तर आभार डॉ.महानंदा राऊत यांनी केले.समारोप स्टाफ सेक्रेटरी डॉ. रमाकांत तिडके, जि.प. प्रा. शाळेचे शिक्षक प्रल्हाद पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
यावेळी डॉ.माजिद शेख,डॉ. दीपक भुसारे,डॉ.किरण गायकवाड,डॉ.अर्जुन मोरे,डॉ. ममताराम करे,डॉ.वसंत झेंडे डॉ. हंसराज जाधव,डॉ.सुवर्णा पाटील,डॉ.अमोल मस्के, डॉ. स्वाती पाटील इत्यादींची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.