ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण

गुरु म्हणजे केवळ धडा शिकवणारा शिक्षक नव्हे; तर विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा देणारा, व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि माणूसपण जागवणारा दीपस्तंभ होय.”असे प्रतिपादन पार्थ नगरीचे नगराध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.


पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी येथे विविध कार्यक्रम आयोजित करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली .
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले, की
भारताची ओळख जगाला अनेक कारणांनी आहे. विविधतेने नटलेली संस्कृती, समृद्ध अध्यात्म, महान संतपरंपरा आणि हजारो वर्षांची ज्ञानपरंपरा ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. या ज्ञानपरंपरेचा आत्मा जर कोणामध्ये वसला असेल, तर तो गुरु या संकल्पनेत आहे. भारतीय संस्कृतीने गुरुचे स्थान इतके उंच मानले की, देवापर्यंत पोहोचण्याचा मार्गही गुरुंच्या चरणांतून जातो, असे सांगितले. म्हणूनच आषाढ पौर्णिमेला साजरी होणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे.एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याला फक्त परीक्षेत गुण मिळवण्यासाठी तयार करत नाही; तो आयुष्याच्या परीक्षेसाठी तयार करतो. अनेकदा विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना दिसतात; पण त्या चुकांमागे दडलेली क्षमता देखील त्यांनाच दिसते. अपयशाने खचलेल्या विद्यार्थ्याच्या पाठीवर विश्वासाने ठेवलेला शिक्षकाचा हात त्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. प्रोत्साहनाचा एक शब्द, कौतुकाची एक नजर किंवा वेळेवर दिलेला योग्य सल्ला विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणूनच शिक्षकांना समाजाचे शिल्पकार म्हटले जाते.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, अनुलोम संस्थेच्या तालुकाप्रमुख मेघा चिंतामणी,मुख्याध्यापक शरद मेढे,ज्ञानेश्वर गायके, अनुजा कुलकर्णी,संपत घारे,रेश्मा सातपुते, शितल आंधळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बालवाडी विभागा मध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे पाद्यपूजन कार्यक्रम आयोजित केल्याने सर्व पालक अत्यंत भावुक झाली होती. तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागात वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये विद्यालयातील ६७ विद्यार्थ्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केल

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *