ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण
श्री जगदंबा मोहटादेवी देवस्थान, मंदिर परिसरामध्ये आज वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मादाय उप आयुक्त श्री नवनाथ जगताप व विश्वस्त मंडळ यांचे हस्ते करण्यात आला.

श्री जगदंबा मोहटादेवी देवस्थान मंदिराचा परिसर अधिक देखणा आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी आता आधुनिक लँडस्केपिंग (भूरचना) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. केवळ झाडे न लावता, संपूर्ण परिसराचा सुनियोजित विकास करून आकर्षक आणि नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या डोंगराळ भागात हजारो विविध वृक्षांची, फुलझाडांची, वेलींची लागवड करण्यात येणार आहे.
लँडस्केपिंग कायमस्वरूपी सुंदर राहण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती वापरली जाणार आहे. पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी स्वयंचलित ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यंत्रणा उभारण्याचे नियोजीत आहे. यामुळे झाडांना गरजेनुसार नियमित पाणी मिळेल. या नियोजनबद्ध लँडस्केपिंगमुळे आगामी काळात मोहटादेवी गड केवळ धार्मिक केंद्र न राहता, एक उत्कृष्ट आणि मनमोहक निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे.
यावेळी विश्वस्त तथा सहा.धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे, ॲड. विक्रम वाडेकर , ॲड. प्रसन्न दराडे, ॲड. कल्याण बडे, शशिकांत दहिफळे, बाबासाहेब दहिफळे, अशोक दहिफळे, बाळासाहेब लाहोटी, शुभम दहिफळे, राजेंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदीप घुले, पुजारी भूषण साकरे तसेच कर्मचारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *