ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण

दादापाटील राजळे महाविद्यालयात पी. एन. पन्नीकर यांच्या स्मृतिदिना निमित्त राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी सांगितले 

, संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी ग्रंथ वाचन महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने किमान रोज एक तास तरी वाचन केले पाहिजे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते. वर्तमानपत्र वाचल्याने जगातील घडामोडींची माहिती होते तर ग्रंथ वाचनाने ज्ञानवृद्धी होते. तसेच स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यासाठी वाचनाचा उपयोग होत असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ.राजकुमार घुले यांनी केले तर आभार कु . संगम वांढेकर यांनी मानले. कार्यक्रमास विज्ञान शाखा प्रमुख डॉ. जे. एन. नेहूल, डॉ. जे. टी. कानडे, डॉ. के . जी. गायकवाड, डॉ. निर्मला काकडे, डॉ. राजू घोलप, प्रा.अमोल धाडगे, प्रा. चंद्रकांत पानसरे, प्रा. प्रदिप धनवडे, प्रा. शरद मिसाळ , प्रा. महेश गोरे आदी शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *