ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल


चार्टर विमान दुर्घटनेत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याबाबत भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०६ १२५ (ब) व इतर लागू तरतुदींनुसार गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची. भीम आर्मीचे अशोक कांबळे याची मागणी


पुणे /बारामती प्रतिनिधी

दिनांक २८जानेवारी२०२६ रोजी बारामती येथे घडलेल्या चार्टर विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे मा. श्री. अजित अनंतराव पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) याचे सह इतर नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.
सदर घटना ही केवळ नैसर्गिक अपघात नसून प्रथमदर्शनी गंभीर निष्काळजीपणा व सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय निर्माण करणारी आहे.असे भीम आर्मीचे अशोक कांबळे आणि शिष्टमंडळाने आरोप केला आहे

, पुढील बाबींची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे :
विमानाची तांत्रिक स्थिती, नियमित देखभाल (Maintenance) व उड्डाणपूर्व तपासणी योग्य पद्धतीने करण्यात आली होती का. प्रतिकूल हवामान परिस्थितीत उड्डाण/लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता का.

वैध परवानग्या, फ्लाइट प्लॅन, उड्‌डाण परवानगी व नागरी विमान वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले की नाही. संबंधित विमान ऑपरेटर कंपनी, देखभाल कंत्राटदार व जबाबदार अधिकारी यांच्या निष्काळजीपणाची भूमिका.

सदर प्रकरणात मानवी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता असल्याने हा दखलपात्र (Cognizable) गुन्हा ठरतो. म्हणून संबंधित विमान ऑपरेटर कंपनी व जबाबदार अधिकारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), कलम १२५(ब)मानवी जीवितास धोका निर्माण करणारी निष्काळजी कृती) तसेच इतर लागू तरतुदींनुसार तात्काळ FIR नोंद करून स्वतंत्र, निष्पक्षपाती सखोल तपास करण्यात यावा ही नम्र विनंती. तसेच पुढील बाबी करण्यात याव्यातः अपघातस्थळ पंचनामा व फॉरेन्सिक तपास स्वतंत्र तज्ज्ञांकडून करावा. DGCA/AAIB चा प्राथमिक अहवाल ताब्यात घेऊन तपासात समाविष्ट करावा. साक्षीदारांचे जबाब सुरक्षितरीत्या नोंदवावेत. पीडित कुटुंबीयांना आवश्यक कायदेशीर संरक्षण द्यावे. सदर अर्ज प्राप्त करून त्याची लेखी पावती (Acknowledgement) देण्यात यावी. गुन्हा नोंद न झाल्यास मला मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच मा. न्यायालय (दंप्रसं कलम १५६ (3)) यांचेकडे दाद मागावी लागेल,असे ही  भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे, संदीप शेलार  उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भीम आर्मी, रवी गायकवाड उपाध्यक्ष मुंबई  प्रदेश, भीम आर्मी, दादासाहेब शिंदे संघटक भीम आर्मी  महाराष्ट्र  प्रदेश यांनी  निवेदनात म्हंटले आहे यावेळी
भीम आर्मीचे शिष्टमंडळ ही.हजार होते

सदर निवेनाची प्रत जिल्हा पोलीस अधिक्षक ग्रामीण पूणे,पोलीस आयुक्त पुणे शहर याना माहितिस्त्व देण्यात आल्या आहेत. 

Share News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *