ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र

ज्वलंत राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणारे न्यूज पोर्टल

 

अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधीदद

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, उपसचिव आणि पैठणमधील रेणुका साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब निर्मळ, पंचायत समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश डूमाले, माजी नगराध्यक्ष जतसिंह परदेशी अशोक जाधव, दत्तात्रय फसाटे, अप्पासाहेब मिसाळ, फिरोज पठाण, अन्सर सय्यद आणि त्यांच्या असंख्य पदाधिकारी तसेच चौका गावचे माजी उपसरपंच अशोक वाघ, पुंडलिक पवार, शीतल लडके, शंकर बोंगाणे, लहानु वाघ, प्रमोद पडूक, राधाकिशन पडूक, छावनाथ घोडगे, शामदास पठाडे तसेच वैजापूर तालुक्यातील सत्यजीत सोमवंशी, ऋतुराज सोमवंशी, सतीश शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

याबरोबरच छत्रपती संभाजीनगर उपमहापौर पदी श्री. राजेंद्र जंजाळ यांची निवड झाल्याबद्दल आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि वैजापूर नगर परिषदेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.या

प्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट,आमदार प्रा.रमेश बोरनारे,आमदार विलास भुमरे,आमदार बालाजी कल्याणकर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व नवनियुक्त नगरसेवक, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *